loader
Breaking News
Breaking News
Foto

मातोश्री लक्ष्मीबाई भाऊ हेदवकर, विद्या निकेतन हेदवी, एस. एस. सी बॅच १९९६-९७ च्या मैत्रीचा आनंदमय स्नेह मेळावा जल्लोषात

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - मा. ल भा. हेदवकर, विद्या निकेतन हेदवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी या हायस्कुल मधील एस. एस. सी. बॅच १९९६-९७ यांचा मैत्रीचा आनंदमय सोहळा रविवार दिनांक : २२/११/२०२६ रोजी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मुंबई - सफाळे, जि. पालघर येथील एस. किणी रिसॉर्टमध्ये आनंदमय वातावरणात मैत्री, प्रेम व आपुलकीचा धागा घट्ट पकडून संपन्न झाला. या सोहळ्याला १९ मित्र-मैत्रिणी उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणित केला. यासाठी मित्रवर्ग प्रसाद आंबेकर, विनोदीनी मोरे यांच्या पुढाकाराने आणि त्यांना सर्वांच्या तोलामोलाची साथ लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकमित्र विनोद ढोर्लेकर यांनी उपस्थित सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत केले. कार्यक्रमाच्या रंगमंचावर मित्र मैत्रिणींपैकी प्रभाकर गुरव, प्रसाद आंबेकर व रश्मी मोरे यांना विराजमान करून त्यांच्या शुभहस्ते विद्येची देवता श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मित्र मौत्रिणींच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून सदर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नंतर दिवंगत मित्र अमोल जाधव, विश्वास नरवणकर व सुनील जोगळे तसेच आपल्या दिवंगत शिक्षक गुरुवर्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

शिक्षकमित्र विनोद ढोर्लेकर यांनी सदर कार्यक्रमाच्या प्रास्तावनेतुन स्नेह सोहळ्याचा उद्देश व महत्व स्पष्ट करून, मैत्रीच्या भेटीची ओढ व होणारा आनंद सविस्तर विषद केला. नंतर टप्प्याटप्प्याने सर्वाना व्यासपीठावर बोलावून पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रसाद आंबेकर, भरत घाडे, विनोद ढोर्लेकर, मंदार गुरव, विनोदीनी मोरे, अविनाश आंबेकर, निलेश कुळये, रश्मी मोरे, प्रभाकर गुरव, नितीन नरवणकर, उदय नरवणकर,भारती आंबेकर, गीता आंबेकर, प्रकाश आंबेकर, महेश पाटील, प्रमोद मोरे, शुभांगी धनावडे, गणपत बाचीम, संजय कुळये या सर्वानी दूर वरून येऊन आपला अमूल्य वेळ देऊन व खुप मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg