loader
Breaking News
Breaking News
Foto

परिसीमन विधेयकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मतमतांतरे! सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘...तोपर्यंत मी काहीही सांगू शकत नाही’

मुंबई: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून (Delimitation Bill 2026) देशातील राजकीय वातावरण तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही या विषयावर सावध भूमिका घेतली आहे. पक्षाची 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या संभाव्य परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, या चर्चेदरम्यान राज्यातील बहुतांश जिल्हाध्यक्षांचा विधेयकाच्या बाजूने कल असल्याचे समोर आले आहे.या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका निश्चित करण्यापूर्वी तळागाळातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी केला. त्यानुसार प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. राज्यातील राजकीय आणि लोकसंख्येच्या बदलत्या परिस्थितीचा विचार करता या विधेयकाकडे कसे पाहिले पाहिजे, यावर बैठकीत चर्चा झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीत काही जिल्हाध्यक्षांनी राज्यातील वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या काही वर्षांत अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मतदारसंघांचे भौगोलिक क्षेत्र आणि मतदारसंख्येतील असमतोल दूर करण्यासाठी पुनर्रचना आवश्यक असल्याचे मत काही पदाधिकाऱ्यांनी मांडले. लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघांची संख्या वाढल्यास लोकप्रतिनिधींना मतदारांपर्यंत पोहोचणे आणि स्थानिक प्रश्न सोडवणे अधिक सोपे होऊ शकते, असा युक्तिवादही करण्यात आला. यामुळे बहुतांश जिल्हाध्यक्षांचा या विधेयकाला अनुकूल प्रतिसाद असल्याचे बैठकीतील चर्चेतून स्पष्ट झाले. मात्र, विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत पक्षात सर्वांचे एकमत झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेचा राजकीय फायद्यासाठी वापर होण्याची शक्यता आणि त्यातून राज्यांमधील राजकीय प्रतिनिधित्वावर होणारे परिणाम याबाबतही पक्षात चिंता व्यक्त केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

संसदेच्या विशेष अधिवेशनात 'सीमांकन विधेयक' (Delimitation Bill) मांडले जाण्याबाबतच्या चर्चांवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अधिवेशनाची घोषणा झाली आहे, परंतु माझ्याकडे अजेंडा (कार्यसूची) आलेला नाही. मी अजून विधेयक पाहिलेले नाही. जोपर्यंत मी विधेयक पाहत नाही, तोपर्यंत मी काहीही सांगू शकत नाही..."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg