loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्राने गौरव

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्ह्यांची उकल करण्यात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी हे देखील उपस्थित होते. दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हस्ते कर्तव्यदक्ष अधिकारी आणि अंमलदारांना प्रशस्तीपत्रे प्रदान करून त्यांच्या कार्याची पावती देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या बैठकीत चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच, भविष्यातही अशाच प्रकारे लोकाभिमुख आणि प्रभावी काम सुरू ठेवण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून झालेल्या या कौतुकामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg