loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरगांवच्या कर्ले ​महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

देवगड (प्रतिनिधी) - संविधानाने प्रत्येक नागरिकाला विकासाची समान संधी आणि अधिकार दिले आहेत या अधिकारांचा वापर करताना कर्तव्याची जाणीव ठेवणे आणि संयमित राहून राष्ट्रनिर्माणात योगदान देणे ही काळाची गरज आहे. संविधानाचा गाभा समजून घेतल्यास युवकांची वाटचाल अधिक सकारात्मक आणि विधायक दिशेने होईल, असे प्रतिपादन प्राचार्य समीर तारी यांनी शिरगांव येथे केले. पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्य आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे मानद अधीक्षक सुधीर साटम उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. उपस्थितांनी संविधानातील मूल्ये आणि तत्त्वे जपण्याची शपथ घेतली. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये या विषयांवर आपली विचारप्रवर्तक मनोगते व्यक्त केली. तसेच, सृष्टी पटेल आणि ममता जाधव या विद्यार्थ्यांनीनी संविधानावर आधारित प्रेरणादायी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ​अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य समीर तारी म्हणाले, आजच्या युवकांनी भारतीय संविधानाने दिलेली ताकद आपल्या विधायक भविष्यासाठी संयमाने वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी युवकांनी केवळ संविधानाचे वाचनच नव्हे, तर त्यावर सखोल चिंतन करणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन युवा पिढीला केले.

टाईम्स स्पेशल

​कार्यक्रमास मानद अधीक्षक सुधीर साटम, प्राचार्य समीर तारी, अँकॅडमिक कोऑरडीनेटर प्राध्यापिका सिद्धी कदम, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या कार्यकम अधिकारी प्राध्यापिका कोमल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका सुगंधा पवार, प्राध्यापिका अक्षता मोंडकर, सोनाली ताम्हणकर, आशय सावंत यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg