मुंबई : गुहागर आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमेवरील १४ गावांच्या परिसरात स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तत्कालीन मंत्री तथा आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी मंजूर करून आणलेली एमआयडीसी राज्यातील सत्तांतरानंतर दुर्लक्षित राहिली आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने ती अचानक रद्द केली. मात्र, ही एमआयडीसी पुन्हा सुरू व्हावी, स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी सातत्याने केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. ठाणे येथे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चिपळूण-गुहागर परिसरात नवीन एमआयडीसी उभारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर गुहागर मतदारसंघात आ. श्री .जाधव सुचवतील तिथे ही एमआयडीसी करण्याचे ना. सामंत यांनी मान्य करून तशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
आमदार श्री.भास्करराव जाधव हे पहिल्यांदा गुहागर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी गुहागर आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमेवरील मार्गताम्हाणेसह १४ गावांच्या परिसरात एमआयडीसी मंजूर करून आणली होती. या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणविरहित उद्योगांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका होती. टेक्सटाईल पार्क, फूड प्रोसेसिंग आणि लॉजिस्टिक हब यांसारखे उद्योग उभारून स्थानिक पातळीवर ४ ते ६ हजार रोजगार निर्माण करण्याचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन त्यांनी केले होते. त्यामुळे या भागातील तरुणांना आपल्या मातीतच रोजगार मिळण्याची मोठी संधी निर्माण होणार होती.मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या प्रकल्पाला अपेक्षित गती मिळाली नाही. त्यानंतर या भागातील लोकांनी उद्योगांमध्ये रोजगार मिळवण्याऐवजी आमच्या आंबा, काजूच्या बागा सांभाळाव्यात व आमच्या हॉटेलमध्ये वेटरची कामे करावीत अशी विकृत मानसिकता असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही एमआयडीसी रद्द करून घेतली. या निर्णयामुळे स्थानिक रोजगाराच्या आशेवर पाणी फेरले गेले. मात्र, आमदार श्री.भास्करराव जाधव यांनी हा विषय सोडून न देता प्रत्येक विधानसभा अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करून शासनाला या निर्णयाबाबत जाब विचारला. प्रदूषण विरहित मंजूर एमआयडीसी रद्द करण्यामागचे कारण काय, स्थानिक बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या संधी का हिरावून घेतल्या, असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी शासनाला सातत्याने धारेवर धरले.जुलै २०२६ मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनातही आमदार श्री. जाधव यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. रद्द करण्यात आलेली एमआयडीसी पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी ठामपणे मांडली. त्यावेळी राज्याचे उद्योगमंत्री ना. श्री. उदय सामंत यांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत ठाणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र बैठक आयोजित केली. या बैठकीला आमदार श्री.भास्करराव जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत चिपळूण-गुहागर परिसरात नवीन एमआयडीसी उभारण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक मान्यता देण्यात आली. या औद्योगिक क्षेत्रासाठी सलग १०० एकर जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात स्वतंत्र खिडकी सुरू करण्याचे आदेश उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी बैठकीतूनच चिपळूणचे प्रांताधिकारी श्री. आकाश निगाडे यांना दिले.
आमदार श्री भास्करराव जाधव यांच्या सूचनेनुसार कोणाचीही जमीन जबरदस्तीने संपादित केली जाणार नाही, घर, गावठाण, मंदिरे तसेच फळबाग असलेल्या जमिनी संपादित केल्या जाणार नाहीत, असे बैठकीत मान्य करण्यात आले. यामुळे औद्योगिक विकासासोबतच स्थानिक नागरिकांच्या हक्कांचे आणि त्यांच्या जमिनींचे संरक्षण करण्याच्या भूमिकेलाही बैठकीत मान्यता मिळाली.एखादा विकासाचा विषय हाती घेतला की तो तडीस नेण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला, कितीही वेळा शासनदरबारी पाठपुरावा करावा लागला तरी मागे न हटणे, ही आमदार श्री. भास्करराव जाधव यांची कार्यशैली राहिली आहे. रद्द झालेल्या एमआयडीसीसाठी त्यांनी विधानसभा अधिवेशनांमध्ये सातत्याने आवाज उठवला, शासनाला प्रश्न विचारले, विविध माध्यमांतून पाठपुरावा केला आणि अखेर या प्रकल्पाला पुन्हा नव्याने मान्यता मिळवून घेतली. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गुहागर-चिपळूण परिसरातील औद्योगिक विकासाच्या आशेला पुन्हा नवी दिशा मिळाली आहे. दरम्यान, उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनीही अधिवेशनात दिलेले आश्वासन प्रत्यक्षात आणण्यासाठी बैठक आयोजित करून घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आमदार श्री जाधव यांनी त्यांचे खुल्या मनाने आभार मानले.
















































































.jpg)





































.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)











































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.