loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

मुंबई (प्रतिनिधी) - बावीस खेडी बौद्धजन संघ, विभाग मुंबई या संस्थेच्यावतीने संस्थेमधील सदस्य गावातील मुंबईस्थित भावकीमधील २०२६ या शैक्षणिक वर्षांतील माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक शालांत या बोर्ड परीक्षा व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत मुंबई येथे गौरवण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सन्मानपत्र, भारतीय संविधान प्रत व भेटवस्तू देऊन एकूण अठरा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरुवातीला स्वागताध्यक्ष आयु.विजय पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आयु. सदानंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सहसचिव आयु. दिपक जाधव व प्रास्ताविक सहसचिव प्रफुल्ल सावंत यांनी केले. याच कार्यक्रमामध्ये नवोदित बौद्ध उपासक आयु. मंजू उत्तम कदम आणि आयु. विश्वास सावंत यांना गौरविण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयु. रोहित जाधव यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg