loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी येथील नामवंत डॉ. राजेंद्र पवार यांची सुकन्या डॉ. ऋषिता पवार हिचा मनसेच्या वतीने सत्कार

वरवेली (वार्ताहर) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील विष्णूपंत पवार मेमोरियल हॉस्पिटलचे मालक व जिल्ह्यातील नामवंत डॉ. राजेंद्र पवार यांची सुकन्या डॉ. ऋषिता राजेंद्र पवार हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ.ऋषिता राजेंद्र पवार हिने वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. पदवी संपादन केली आहे. डॉ.ऋषिता यांना गुहागर तालुक्यामध्ये वैद्यकीय सेवा करून आपले वडील डॉ. राजेंद्र पवार यांच्यासारखी तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांची सेवा करावयाची आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, पत्रकार गणेश किर्वे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg