loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी GGPS शाळेची उत्तुंग भरारी

रत्नागिरी - शालेय क्रिकेट स्पर्धा वर्ष २०२५-२६ मध्ये १४ वर्षांखालील वयोगटात GGPS संघाने जिल्हा स्तरावर बाजी मारत विभागीय स्तरावर दिमाखदारपणे प्रवेश केला. कोल्हापूर,हातकणंगले येथे सातारा,सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांसाठी नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्तरावर GGPS टीमने दैदिप्यमान कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना सिंधुदुर्ग संघासमोर ६ षटकांत १२५ धावांचे बलाढ्य आव्हान GGPS ने ठेवले होते.यामध्ये कु देवांग गुरव नाबाद ६९(२९),कु.आराध्य मोंडकर २३(८) आणि कु.रुद्र पांढरे नाबाद २५(१०) यांनी चमकदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरात लक्ष्य गाठताना सिंधुदुर्ग संघाचा डाव अवघ्या ५७ धावांपर्यंतच मजल गाठू शकला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

GGPS शाळेच्या कारकिर्दीत प्रथमच जिल्हा आणि विभागीय स्तरावर क्रिकेट अजिंक्यपद प्राप्त झाल्याने रत्नागिरी जिल्ह्याची शान म्हणून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ह्या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक श्री.कदम यांचे प्रशिक्षण व मुख्याध्यापिका सौ.पाटणकर, पर्यवेक्षक श्री.अकिवटे आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील क्रिकेट स्पर्धा ही राज्यस्तरासाठी नाशिक येथे दि.२८ व २९ नोव्हेंबर रोजी खेळवली जाणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg