loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरच्या सुपुत्राची MPSC मध्ये दुहेरी भरारी

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावातील गुणवंत विद्यार्थी निखिल अनिल मोहिते यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. 'दुय्यम निबंधक श्रेणी-१' (Sub Registrar Grade-1) आणि 'राज्य कर निरीक्षक' (State Tax Inspector - STI) अशा दोन्ही मानाच्या पदांवर एकाच वेळी निवड झाल्याबद्दल चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी या यशस्वी विद्यार्थ्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद असून, तालुक्यातील इतर तरुणांसाठी हे प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास याप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला. या गौरव सोहळ्यादरम्यान तालुक्यातील लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, कडवई गावचे सरपंच दत्ताराम ओकटे, संतोष भडवळकर, रमेश डिके, संतोष जाधव आणि बाळा डिके, कौस्तुभ सुर्वे यांच्यासह चिखली बौद्धजन उत्कर्ष मंडळ व मंडळाचे पदाधिकारी धर्मदास बाबू मोहिते, संदिप देवजी पवार, काशिराम सिताराम मोहिते, संजय तानू मोहिते, संजय महादेव मोहिते, अनिल सिताराम मोहिते, विजय महादेव मोहिते, मनोज शंकर मोहिते, निखील अनिल मोहिते, योगेश पवार इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनीही या यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक करत भावी प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg