loader
Breaking News
Breaking News
Foto

मोर्ले गावात घरात शिरलेले खवले मांजर वन विभागाच्या स्वाधीन

दोडामार्ग,(प्रतिनिधी) - जंगली हत्तींचा वावर असलेल्या मोर्ले गावात सोमवारी रात्री उशिरा गावातील रहिवासी रमेश गवस यांच्या घरात जंगलातून आलेल्या खवले मांजराने थेट शिरकाव करून घरातील फ्रिज खाली आसरा घेतला. यामुळे रमेश गवस तसेच घरातील लोकांची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गोपाळ गवस, संतोष मोरये, इतर ग्रामस्थ दाखल झाले. खवले मांजराला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता त्याला फ्रीज खाली ठेवले. दोडामार्ग वनविभाग यांना माहिती दिली. मंगळवारी सकाळी दोडामार्ग वन विभाग क्षेञपाल संभाजी पाटील व इतर वन कर्मचारी मोर्ले गावात गेले. या नंतर हे खवले मांजर वन विभागाच्या स्वाधीन करुन नैसर्गिक आधिवासात सोडण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg