रत्नागिरी - महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री शिक्षण संस्था, संचालित महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी येथील विद्यार्थिनींनी पुणे येथील के. बी. जोशी इन्स्टिट्यूट येथे आयोजित एसएनडीटी प्रादेशिक युवा महोत्सव २०२६-२७ मध्ये आपल्या कलागुणांचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत दैदिप्यमान यश संपादन केले. विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाने नाट्य विभागाची विजेतेपदाची चषक पटकावली. या महोत्सवात साहित्य, ललित कला, नाट्य आणि नृत्य अशा विविध विभागांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत विद्यार्थिनींनी अनेक पारितोषिके मिळविली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. साहित्य विभागात वक्तृत्व स्पर्धेतील मराठी भाषणासाठी पूर्वा बुटाला – तृतीय क्रमांक, तर हिंदी भाषणासाठी सफा काझी – उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. वादविवाद स्पर्धेत हिंदीमध्ये आयेशा मुल्ला व सफा काझी – तृतीय क्रमांक, तर इंग्रजीमध्ये तीर्था नारवणकर व नुपूर सावंत – द्वितीय क्रमांक मिळविला. निबंध स्पर्धेत मराठीसाठी तेजस्विनी पाटील – तृतीय क्रमांक, तर हिंदीसाठी केदांती कीर – तृतीय क्रमांक मिळविला.
ललित कला विभागात कोलाज स्पर्धेत रिया कीर – तृतीय क्रमांक मिळविला. मातीशिल्प स्पर्धेत श्रावणी आंब्रे – प्रथम क्रमांक, आयेशा मुल्ला – द्वितीय क्रमांक आणि सानिका कदम – तृतीय क्रमांक मिळवून विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. नाट्य विभागात विद्यार्थिनींनी विशेष दमदार कामगिरी केली. एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक, मूकाभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक, नाटिका स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि पथनाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच नकला स्पर्धेत सानिका कदम – उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या दमदार कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाने नाट्य विभागाची विजेतेपदाची चषक पटकावली. नृत्य विभागातही विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांची प्रभावी छाप उमटवली. लोकनृत्य स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गेल्या अनेक वर्षांपासून एसएनडीटी युवा महोत्सवात सातत्याने सहभागी होत असून, विविध सांस्कृतिक विभागांमध्ये आपल्या गुणवत्तेची आणि कलागुणांची प्रभावी छाप उमटवत आहेत. या स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत विविध विभागांमध्ये चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळविण्याची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांचा सातत्यपूर्ण सराव, मेहनत, सांघिक भावना आणि योग्य मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सर्व विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रतिभा लोंढे तसेच थिएटरसाठी मयूर साळवी, श्रेयस माईन, साहिल चरकरी व नृत्य दिग्दर्शक म्हणून रुपेश धाडवे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विजेता विद्यार्थिनींचे महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा कोतवडेकर, रत्नागिरी प्रकल्पाचे अध्यक्ष श्री .रवींद्र देव, स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य ,पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालय परिवाराने आनंद व्यक्त केला. महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शिक्षणासोबतच कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशामुळे विद्यार्थिनींच्या कलागुणांना नवे व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे. विद्यार्थिनींच्या या विजयी भरारीबद्दल महाविद्यालय परिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

















































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.