loader
Breaking News
Breaking News
Foto

कारिवडे येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न; मालवण संघ ठरला विजेता

​सावंतवाडी (प्रतिनिधी): कारिवडे येथील हायस्कूलच्या मैदानावर 'सचिन सावंत मित्र मंडळ' आयोजित भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेत गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ मातब्बर संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मालवण संघाने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले, तर वेंगुर्ल्याचा 'जय मानसेश्वर संघ' उपविजेता ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​स्पर्धेत राधाकृष्ण पेडणेकर, सी. ए. नाईक आणि हेमंत गावडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेसाठी भाजपा युवा नेते विशाल परब यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कारिवडेचे उद्योजक महादेव नाईक, भव्यांश स्पोर्ट्स, उपसरपंच महेश गावकर, गंगाराम परब, विष्णु परब यांच्यासह बाबल गोम्स, पीटर गोम्स, जॅक्सन गोम्स, कारू गोम्स आणि सतान गोम्स यांचे मोलाचे आर्थिक व स्थानिक सहकार्य मिळाले.

टाईम्स स्पेशल

​ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमन गावकर, रोशन शेटकर, नानु परब, गणेश परब, ओम तागेश वास्कर, कृष्णा गावकर व कौस्तुभ गावकर यांनी परिश्रम घेतले. सचिन सावंत मित्र मंडळाच्या उत्तम नियोजनामुळे या स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg