loader
Breaking News
Breaking News
Foto

दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर उत्साहात

म्हसळा : म्हसळा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, म्हसळा येथे उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथून विशेष वैद्यकीय तज्ज्ञांची टीम उपस्थित होती. शिबिराला म्हसळा शहर व तालुक्यातील जवळपास ४७ दिव्यांग बांधव-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून पात्र दिव्यांग व्यक्तींना आवश्यक तपासणी व मार्गदर्शन मिळाल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास मोठी मदत होणार आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी शाहनवाज शाहिद उकये, समीर बनकर – तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुजित काते, मंगेश मशेलकर, अब्दुल कवी मसलाई, विश्वजीत सलावकर तसेच म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व सर्व सहकारी कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, वैद्यकीय पथकाचे, ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तसेच सहभागी झालेल्या सर्व दिव्यांग बांधव-भगिनींचे आयोजक शाहनवाज शाहिद उकये यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg