loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रावण सोमवारनिमित्त संगमेश्वरात वारकरी दिंडीचा भक्तिमय सोहळा

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : श्रावण सोमवार आणि भागवत एकादशीचे औचित्य साधून शास्त्री तिरी संत वारकरी संप्रदाय, संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वारकरी दिंडी सोमवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली. भजन, नामस्मरण आणि टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीत महिला-पुरुषांसह लहान-थोर भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर रामपेठ येथील श्रीराम मंदिरातून दिंडीची सुरुवात करण्यात आली. तेथून गणपती मंदिर आणि निनावी मंदिर येथे रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर दिंडी संगमेश्वर सोनवी चौकातून महामार्गाने जाखमाता मंदिराकडे रवाना झाली. पुढे कसबा येथील संभाजी महाराज स्मारकाजवळ रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर दिंडी कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिरात पोहोचली. मंदिर परिसरात रिंगण सोहळा झाल्यानंतर दिंडीची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

दिंडीच्या मार्गावर ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे दिंडीचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी भाविकांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. वारकरी मंडळींच्या भक्तिगीतांनी आणि नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. श्रावण सोमवारच्या निमित्ताने आयोजित या दिंडीमुळे संगमेश्वर परिसरात वारकरी परंपरेचा जागर झाला. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांमुळे दिंडीला विशेष शोभा आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg