loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषदेत दोन दिवसीय 'रानभाज्या महोत्सवा'चा उत्साहात शुभारंभ

​सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात महिला व बालकल्याण समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय "रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवा"चा शुभारंभ नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. या महोत्सवाला पहिल्याच दिवशी स्थानिक ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गावठी व रानभाज्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​पावसाळ्याच्या दिवसांत निसर्गात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या औषधी व पौष्टिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने २५ आणि २६ ऑगस्ट रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ​उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी सर्व विक्रेत्यांशी संवाद साधून रानभाज्यांची माहिती घेतली आणि स्वत: गावठी भाज्या खरेदी करत या उपक्रमाचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

​या कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर, सभापती सुधीर आरीवडेकर, सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका निलम नाईक, नगरसेविका शर्वरी धारगळकर, नगरसेविका पेडणेकर यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg