loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोस मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत रस्त्याच्या कामाला मंजुरी, अत्याधुनिक उपकरणांद्वारे सर्व्हेचे काम सुरू

सावंतवाडी, ( प्रतिनिधी) - आरोस मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत आरोस या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून, रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने सर्व्हेचे काम वेगाने सुरू झाले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रस्त्यावर गेल्या बर्‍याच वर्षांपासून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणा कामासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर या प्रयत्नांना यश येऊन रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. सध्या अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने सर्व्हेचे काम सुरू झाल्याने लवकरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी रस्ता सर्व्हे कर्मचार्‍यांसोबत शंकर नाईक, प्रसाद नाईक, ग्रामस्थ संजय कळंगुटकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg