loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत अनंत चतुर्दशीला श्रींचे थाटात विसर्जन; फुगड्यांच्या तालावर महिलांचा उत्साह

​सावंतवाडी, दि. २५ सप्टेंबर (प्रतिनिधी):सावंतवाडी शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त आज गणेश विसर्जनाची भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात आली. शहरात भक्तिमय आणि जल्लोषाच्या वातावरणात चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नगरपालिका भाजी मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.​चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे नेटके नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक महिलांनी पारंपरिक सामूहिक फुगड्यांचे फेर धरत विविध कार्यक्रम सादर केले. महिलांच्या या उत्साही सहभागाने विसर्जन मिरवणुकीतील आनंद द्विगुणीत केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या तालावर लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg