loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रज्वल घडशींच्या मृत्यूनंतरही ठेकेदारावर कारवाई नाही; बहुजन विकास आघाडीचा महामार्ग रोकोचा इशारा

संगमेश्वर / सत्यवान विचारे :गणपती विसर्जनासाठी सोनवी नदीपात्रात उतरलेल्या प्रज्वल पुरुषोत्तम घडशी (वय वर्ष 22 रा. माभळे) यांचा नदीपात्रातील खोल खड्ड्यात बुडून मृत्यू होऊन पाच दिवस उलटले; मात्र या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या संबंधित महामार्ग ठेकेदारावर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. मृत्यू झाला, निवेदने झाली, आश्वासने मिळाली; पण कारवाई कुठे? असा सवाल बहुजन विकास आघाडीने उपस्थित केला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी सोनवी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात गाळ काढून तो महामार्गाच्या भरावासाठी वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गणपती विसर्जन घाटालगत तब्बल २५ ते ३० फूट खोल खड्डे निर्माण झाले होते. हे खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडे वारंवार केली होती. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.याच खड्ड्यात बुडून प्रज्वल घडशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे ‘धोक्याची पूर्वसूचना असूनही प्रशासन गप्प का?’ असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रज्वल यांच्या मृत्यूनंतर बहुजन विकास आघाडीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, पाच दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, प्रज्वल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाच दिवसांत योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, पाचवा दिवस उलटूनही प्रशासनाकडून कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित अधिकारी उद्या आपले म्हणणे सादर करणार असल्याची माहिती प्रज्वल यांचे आजोबा गुणाजी घडशी यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

प्रज्वल यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करत बहुजन विकास आघाडीने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.“प्रज्वलच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही, तर बहुजन विकास आघाडी रस्त्यावर उतरेल. प्रसंगी मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात येईल,” असा इशारा अध्यक्ष सुरेश भायजे यांनी दिला.संगमेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन देताना सुरेश भायजे, दिलीप चौगुले (लांजा), विलास डिके (चिपळूण), संतोष चांदे (कसबा), दत्ताराम लांबे (आरवली), सुनील भुवड, दीपक शिंगण, गणपत गोटेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg