loader
Breaking News
Breaking News
Foto

गावखडीत बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप

गावखडी / वार्ताहर :"गणपती बाप्पा मोरया" " मंगलमूर्ती मोरया "असा जयघोष करीत बारा दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात अनंत चतुर्दशी दिवशी गावखडी येथील श्री गणेश भक्तगणांनी निरोप देण्यात आला. कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट आहे .एरवी भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात पण भाद्रपद महिन्यात श्री गणेश चतुर्थीला मात्र श्री गणेशाची घरोघरी भाविक प्राणप्रतिष्ठापना करतात .आज दहा दिवसांच्या गणरायाची ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक गावखडी येथे करण्यात आली .आज पाऊस नसल्यामुळे गणेश विसर्जनाला अडचण आली नाही. गावखडीत समुद्रकिनाऱ्यावर गणराया आम्हाला चांगले आरोग्य लाभो आम्हाला सुखी ठेव ,तसेच आमची भात शेती चांगली होऊ दे. पीक आमच्या हाती मिळू दे.आम्हा सर्वांना सुखी ठेव असे साकडे लाडक्या गणरायाला भक्तांनी घातले. "गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर" या " "एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार" असा जयघोष करीत गावखडीत गणरायाला सर्वांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg