loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी स्थानिक महिलांसोबत धरला फुगडीचा फेर

सावंतवाडी (प्रतिनिधी): गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीचा सण म्हणजे संपूर्ण कोकणात भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाचे उधाण! घराघरांतून मांगल्य आणि पारंपरिक संस्कृतीचा सुगंध दरवळत असताना, सावंतवाडीत या सणाचा एक अत्यंत सुंदर, आपुलकीचा आणि मन जिंकणारा प्रसंग पाहायला मिळाला. सावंतवाडी शहराच्या प्रथम नागरिक, लोकनियुक्त नगराध्यक्षा तथा सावंतवाडी संस्थानच्या सुनबाई सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी श्री गणेशाच्या दर्शनादरम्यान स्थानिक महिलांसोबत थेट फुगडीचा फेर धरून गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित केला. दर्शनादरम्यान एका घरात स्थानिक महिलांचा फुगडीचा खेळ रंगला होता. लोकसंस्कृती, परंपरा आणि सणाचा उत्साह पाहून सौ. श्रद्धाराजे भोसले स्वतःला रोखू शकल्या नाहीत. अतिशय सहजतेने आणि उत्साहाने त्याही या पारंपरिक खेळात सहभागी झाल्या आणि महिलांसोबत फुगडीचा फेर धरला. आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीला आणि संस्थानच्या सूनबाईंना अशा प्रकारे आपल्यात मिसळून आनंदाने फुगडी खेळताना पाहून उपस्थित महिला व नागरिक भावुक आणि आनंदित झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg