loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेत दापोलीच्या सर्वज्ञ घागची निवड

दापोली (प्रतिनिधी ) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी तसेच रत्नागिरी जिल्हा महसूल क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेत दापोली तालुक्यातील संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी सर्वज्ञ सुयोग घाग याने उल्लेखनीय कामगिरी करत १७ वर्षांखालील वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मल्लखांब या पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकारातील कौशल्य, चपळता, ताकद, संतुलन आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर सर्वज्ञ सुयोग घाग याने उत्कृष्ट सादरीकरण केले. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याची पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळविलेले हे यश पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरावे, अशा शब्दांत सर्वज्ञचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg