loader
Breaking News
Breaking News
Foto

माडखोल ग्रामपंचायतीची लाखो रुपयांची ई-कचरा गाडी पडून; स्वराज्य दिव्यांग संस्थेचा गंभीर आरोप

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी ग्रामपंचायतींना ई-कचरा संकलनाचे स्पष्ट आदेश दिलेले असताना, माडखोल ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली ई-कचरा संकलन गाडी पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वराज्य दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल लातीये यांनी हा आरोप केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वर्ष २०२३ मध्ये माडखोल ग्रामपंचायतीने आपल्या अर्थसंकल्पातून ई-कचरा संकलनासाठी लाखो रुपये खर्च करून विशेष वाहनाची खरेदी केली होती. मात्र, खरेदीनंतर ग्रामपंचायतीने या वाहनाची कोणतीही योग्य देखभाल केली नाही. हे वाहन अत्यंत निष्काळजीपणे बेवारस स्थितीत सोडून देण्यात आले होते आणि आता त्या जागेवरून ही गाडीच चोरीला गेली आहे, असा थेट आरोप लातीये यांनी केला आहे. या गैरकारभाराविरोधात राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री श्री. योगेश कदम यांच्याकडे पत्राद्वारे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे स्वप्निल लातीये यांनी स्पष्ट केले. लाखो रुपयांच्या सरकारी निधीचा अपव्यय करून ई-कचरा गाडी बेवारस सोडणे आणि ती गायब होणे, या प्रकारामुळे माडखोल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg