loader
Breaking News
Breaking News
Foto

मालानी इम्पोरियल फर्निचर कारखाना आगीत भस्मसात, प्रशांत यादवांकडून घटनास्थळी पाहणी

खेर्डी चिपळूण (संतोष पिलके ) : खेर्डी, ता. चिपळूण येथील मालानी इम्पोरियल फर्निचर कारखान्याला २४ सप्टेंबर रोजी रात्री भीषण आग लागून कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते तथा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी कारखान्याला भेट देत नुकसानीची पाहणी केली. तसेच कारखाना मालक मालानी यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी यादव यांनी, या दुर्दैवी संकटात आपण एकटे नाही. आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत, असा विश्वास दिला. तसेच स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून शासकीय पातळीवरून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कठीण प्रसंगी उद्योजक व कामगारांच्या पाठीशी समाजाने उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. संकट कितीही मोठे असले तरी आपण सर्वजण एकत्र उभे राहिलो, तर त्यातून मार्ग नक्कीच निघतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg