loader
Breaking News
Breaking News
Foto

ढोल-ताशांच्या गजरात‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष;दहा दिवसांच्या गणरायाला रसायनीकरांचा भावपूर्ण निरोप!

रसायनी(आनंद पवार) गेल्या दहा दिवसांपासून रसायनी परिसरात भक्तीमय वातावरणात विराजमान झालेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या..अशा जयघोषांनी रसायनी परिसर दुमदुमून गेला.दुपारी चार वाजल्यापासूनच घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली.त्यानंतर सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात निघाल्या.रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा जवळपास २० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली होती.दहा दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर या मंडळांनी थाटामाटात मिरवणूक काढत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिरवणुकीत ढोल-ताशांचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी,फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.महिला, पुरुष,युवक,युवती तसेच लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभाग घेतला.पाताळगंगा नदीकिनारा,मोहोपाडा तलाव तसेच रिस पुलावरील विसर्जन घाटावर गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देताना अनेक गणेशभक्त भावुक झाले होते.यावेळी ‘यूँ न जाओ छोड़कर... ये गणपती अपना घर... तुम हो हमारे देवा... तुम कुछ हमारे, सब कुछ देवा...’ अशा भावस्पर्शी गीतांनी वातावरण अधिकच हृदयस्पर्शी झाले.

टाइम्स स्पेशल

दहा दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांच्या डोळ्यांत विरहाची भावना होती,तर पुढील वर्षी पुन्हा त्याच उत्साहाने गणरायाचे स्वागत करण्याची आतुरताही दिसून आली.भक्ती, उत्साह आणि भावनेचा सुंदर संगम असलेल्या वातावरणात रसायनीकरांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध विसर्जन घाट तसेच मिरवणूक मार्गांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या आदेशानुसार आणि खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी स्वतः विसर्जन मिरवणुका तसेच विविध विसर्जन घाटांवर लक्ष ठेवत परिस्थितीचा आढावा घेतला.पोलीस कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आवश्यक सूचना व मार्गदर्शन देत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.त्यामुळे रसायनी परिसरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता भक्ती,उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg