loader
Breaking News
Breaking News
Foto

अवघ्या अडीच वर्षाच्या शौर्या जाधवला ‘स्वप्न सुंदरी‘ पुरस्कार

आबलोली (संदेश कदम) - पनवेल टाइम्स आयोजित सिझन,२०२६ , या मॉडलिंग स्पर्धेमध्ये अडीच वर्षीय गट, मोठे एकूण २५ मॉडलिंग मुलींनी आणि मॉडलिंग स्त्रीयानी भाग घेतला होता. मात्र या छोट्या गटातून मौजे लोवले गावातील आणि संगमेश्वर तालुक्यातील कु. शौर्या स्नेहल अमर जाधव या छोट्या मुलीने सौंदर्य सुंदरी म्हणून पुरस्कार प्राप्त केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर पुरस्कार मोडलिंग कोरिओग्राफर मा. देवदत्त घरत यांच्या हस्ते बहुसंखेच्या उपस्थित प्रदान करण्यात आला. शौर्या हिने लहान वयात फिलिप कार्ड, ऍमेझॉन, सिझन १३ किड्स फॅशन मॉडलिंग यामध्ये स्वतःची जाहिरातही केली आहे. या ठिकाणी सुद्धा तिला जाहिरातीची संधी मिळाली आहे. या पनवेल टाईम्स सौदर्य सुंदरी या कार्यक्रमासाठी, रायगडचे पालकमंत्री नाम. भरतशेठ गोगावले, आमदार, प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, महापौर नितीन पाटील, प्रीतम म्हात्रे, अरविंद म्हात्रे, आणि महाराष्ट्राची लावणी क्वीन हिंदवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले होते ते ‘पनवेल टाइम्स’ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg