loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा डोंबिवली रासरंग दांडिया उत्सव - २०२६ यंदा रद्द

दीपकुमार सावंत : श्री नवदुर्गा युवा मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा डोंबिवली रासरंग दांडिया उत्सव - २०२६ यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातचे गेल्याने अनेक शेतकरी कुटुंबे आज संकटात आहेत. अशा वेळी आपण नेहमीप्रमाणे उत्सव साजरा करण्यापेक्षा आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी रासरंगच्या आयोजनासाठी करण्यात येणारा खर्च यंदा उत्सवावर न करता संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वळविण्यात येणार आहे. तसेच श्री नवदुर्गा युवा मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भरीव मदत करण्यात येणार आहे. तर नवरात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवत यंदा साधेपणाने देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना केली जाईल. तसेच राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी नवचंडी यज्ञ देखील केला जाणार आहे. उत्सव पुन्हा करता येतील; मात्र संकटाच्या काळात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg