loader
Breaking News
Breaking News
Foto

‘Not Me, But You’चा संदेश देत राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

दापोली, : वराडकर–बेलोसे कनिष्ठ महाविद्यालय, दापोलीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने व्याख्यान तसेच स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचालित न. का. वराडकर कला, रा. वि. बेलोसे वाणिज्य कनिष्ठ/वरिष्ठ महाविद्यालय आणि शांतिलाल जैन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, दापोली येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड होते. प्रमुख पाहुण्या म्हणून वाणिज्य विभाग वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. जयश्री गव्हाणे उपस्थित होत्या. तसेच एल. पी. पाटील (पर्यवेक्षक) यांची विशेष उपस्थिती लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात बी. बी. ढवळे यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यातील NSS ची भूमिका आणि समाजसेवेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘Not Me But You’ या राष्ट्रीय सेवा योजना ब्रीदवाक्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा, समाजाच्या गरजा ओळखून सेवाभावी वृत्तीने कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत महाविद्यालय परिसरात स्वच्छता उपक्रम राबवून स्वच्छता व सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी कोवळे यांनी केले, तर युवराज आग्रे यांनी आभार मानले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या उपक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg