loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजाच्या ज्ञानेश्वरीने बाप्पासाठी अवघ्या अर्ध्या दिवसात बनवले ४० नैवेद्याचे पदार्थ

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर): गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारच्या नैवेद्याचा भोग चढवण्याची परंपरा आहे. मात्र, लांजा येथील एका तरुणीने आपल्या अनोख्या पाककलेच्या जोरावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. लांजातील तरुणी ज्ञानेश्वरी योगेश वाघधरे हिने अवघ्या अर्ध्या दिवसात बाप्पासाठी तब्बल ४० वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्याचे पदार्थ तयार करण्याचा अनोखा विक्रम केला आहे. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सध्या संपूर्ण तालुक्यात आणि सोशल मीडियावर तिचे प्रचंड कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजातील उद्योजक योगेश वाघधरे,लांजाच्या पहिल्या नगराध्यक्षा संपदा योगेश वाघधरे यांची ज्ञानेश्वरी वाघधरे कन्या आहे. ज्ञानेश्वरी पुढील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेणार आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घरात लगबग सुरू असताना, ज्ञानेश्वरीने कोणतीही घाईगडबड न करता, काकी भक्ति वाघधरे यांच्या मदतीने नियोजनबद्ध रीतीने काम करत अवघ्या काही तासांत (अर्ध्या दिवसात) ४० पदार्थांचा नैवेद्य तयार केला. यामध्ये पारंपारिक मोदक, विविध प्रकारचे लाडू, खीर, पुऱ्या,गुलाब जामून,उसळ, वेगवेगळ्या भाज्या, चटण्या, भजी आणि विविध पक्वान्न अशा अनेक पदार्थांचा समावेश होता. बाप्पाच्या पुढ्यात ठेवलेले हे ४० पदार्थांचे ताट पाहून तिच्या घरी येणारे पाहुणे आणि नातेवाईक थक्क झाले.

टाइम्स स्पेशल

एकाच वेळी एवढे पदार्थ बनवणे अत्यंत कष्टाचे काम असताना, ज्ञानेश्वरीने ते अगदी आनंदाने आणि लीलया पार पाडले असून तिच्या या सुगरणपणाची आणि कौशल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून, लांजा परिसरातील नागरिकांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आजच्या आधुनिक युगातही तरुणी आपल्या पारंपारिक पाककलेचा वारसा इतक्या उत्साहाने जपत असल्याचे ज्ञानेश्वरीने दाखवून दिले आहे. नव्या युगातील ज्ञानेश्वरी या तरूणीचा इतर तरूणींनी आदर्श घेण्यासारखा असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg