loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

राजापूर / तुषार पाचलकर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने आयोजित राजापूर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी गटात सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचलच्या संघाने दमदार कामगिरी करत तालुकास्तरीय अजिंक्यपद पटकावले. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, पंचायत समिती राजापूर तसेच राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत पाचलच्या १९ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील चुरशीच्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी आक्रमक चढाया, भक्कम बचाव आणि सांघिक समन्वयाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अंतिम सामन्यातही संघाने प्रभावी खेळ करत दणदणीत विजय मिळवला आणि तालुकास्तरीय अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.या उल्लेखनीय यशामुळे सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेश सावंत, कार्याध्यक्ष अशोक सक्रे, सचिव रामचंद्र वरेकर, सहसचिव किशोर नारकर, खजिनदार राजन लब्दे तसेच सर्व संचालक मंडळाने खेळाडूंचे अभिनंदन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा गुरखे, पर्यवेक्षिका प्रमिला गांधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विजेत्या संघाचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

या संघाला क्रीडा शिक्षक नितीन सांडम यांचे मार्गदर्शन लाभले. तालुकास्तरीय स्पर्धेतील या यशानंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही पाचलच्या संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg