मालवण, (प्रतिनिधी) : कुडाळ व मालवण तालुक्यातील जीर्ण झालेल्या तसेच स्वतंत्र तलाठी कार्यालयांच्या इमारती उपलब्ध नसलेल्या तलाठी सजांसाठी नवीन इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे तसेच खासदार नारायणराव राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण ९ तलाठी कार्यालयांच्या इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामांसाठी एकूण १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ व मालवण तालुक्यातील अनेक तलाठी सजांची कार्यालये जीर्ण अवस्थेत असून काही ठिकाणी तलाठ्यांना स्वतंत्र कार्यालयाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजासह नागरिकांना आवश्यक महसुली सेवा देताना अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन नवीन कार्यालयीन इमारती उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मंजूर निधीनुसार कुडाळ तालुक्यातील गोठोस येथे तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी २३ लाख रुपये, तर आंब्रड, कुंदे, घोटगे, निरूखे आणि वर्दे येथील तलाठी कार्यालयांच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी २२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय मालवण तालुक्यातील किर्लोस तलाठी कार्यालयासाठी १४ लाख रुपये, तर मसुरे-देऊळवाडा येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून संबंधित ठिकाणी आवश्यक त्या सोयी-सुविधांनी युक्त अशा कार्यालयीन इमारती उभारण्यात येणार आहेत.
नवीन इमारती उपलब्ध झाल्यानंतर तलाठी व मंडल अधिकारी यांना महसूलविषयक कामकाज अधिक सुलभतेने करता येणार असून नागरिकांनाही विविध महसुली दाखले, नोंदी, जमिनीशी संबंधित कामे तसेच अन्य शासकीय सेवांसाठी अधिक चांगली कार्यालयीन सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील महसूल यंत्रणेचा महत्त्वाचा दुवा असलेल्या तलाठी कार्यालयांच्या पायाभूत सुविधांना या निधीमुळे बळकटी मिळणार आहे. मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.