loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील सर्व डांबरी रस्त्यांच्या कामांची आणि गुणवत्तेची दिवाळीपूर्वी सखोल तपासणी करण्याचा धडक निर्णय

रत्नागिरी : पावसाळा संपताच उघड्या पडलेल्या रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) कोट्यवधी रुपयांच्या निधीतून जिल्हा परिषदेंतर्गत उभारण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाची आता थेट प्रशासन गंभीर दखल घेणार आहे. जिल्ह्यातील अशा सर्व डांबरी रस्त्यांच्या कामांची आणि गुणवत्तेची दिवाळीपूर्वी सखोल तपासणी म्हणजेच ’क्वालिटी ऑडिट’ करण्याचा एक धडक निर्णय जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने घेतला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील रस्त्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डीपीसीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून रस्ते तयार करण्यात आले होते, परंतु अनेक ठिकाणी अवघ्या काही महिन्यांतच डांबर उखडून मोठे खड्डे पडल्याच्या अनेक तक्रारी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्या होत्या. सार्वजनिक निधीचा अपव्यय रोखण्यासाठी आता सर्व कामांची चौकशी केली जाणार आहे. या तपासणीदरम्यान ज्या रस्त्यांचा दर्जा खालावलेला आढळेल किंवा नियमानुसार काम झाले नसेल, ते रस्ते संबंधित ठेकेदारांना स्वतःच्या खर्चाने पूर्ववत दुरुस्त करून द्यावे लागतील. यासाठी दोषी ठेकेदारांना तातडीने ’कारण दाखवा’ नोटीस बजावली जाईल. नोटीस मिळूनही काम न करणार्‍या किंवा टाळाटाळ करणार्‍या ठेकेदारांना थेट काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

याशिवाय रस्ते खोदाई, पावसामुळे होणारी पडझड आणि महावितरणच्या कामांमुळे रस्त्यांच्या होणार्‍या नुकसानीला आळा घालण्यासाठी नगरपालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेचे स्वतंत्र ’नुकसान भरपाई व दुरुस्ती धोरण’ तयार केले जाणार आहे. राजापूर, गुहागर आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये भूयारी वीजवाहिन्यांच्या कामादरम्यान महावितरणच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महावितरणवर आवश्यक ती कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याचे कडक निर्देश उपाध्यक्ष विलास चाळके यांनी दिले आहेत. या कडक पावित्र्यामुळे आता कामचुकार ठेकेदार आणि प्रशासकीय यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg