loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड कोळीवाडा येथील गणेशोत्सवातील गोरक्षनाथ प्रकटीकरण चलचित्र गणेशभक्तांचे आकर्षण

कोर्लई,ता.२४(राजीव नेवासेकर)मुरुड नगरपरिषदेचे नगरसेवक पांडुरंग आरेकर यांच्या कोळीवाड्यातील निवासस्थानी स्थानापन्न झालेली गणरायाची आकर्षक मंगलमूर्ती व गोरक्षनाथ प्रकटीकरण चलचित्र गणेशभक्तांचे आकर्षण ठरले आहे !दरवर्षी पांडुरंग आरेकर आपल्या घरी गणेशोत्सवात विविध विषयावर चलचित्र सादरीकरण करत असतात. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात अनोखे चलतचित्र देखाव्यांची परंपरा चालू ठेवणारे माझी नगराध्यक्ष कृष्णा आरेकर यांचे सुपुत्र तथा विद्यमान नगसेवक पांडुरंग कृष्णा आरेकर यांनी आपल्या कला कौश्यल्यातून आज पर्यंत चलतचित्राचे देखावे गणेशोत्सवाला सादर केले आहेत .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदा घरगुती गणेशोत्सवात बोधपर आध्यात्मिक चलतचित्र देखाव्यात नवनाथांच्या कथेवर आधारित मछिंद्रनाथानी गोरक्षनाथाच्या प्रकटीकरण सादर केले आहे.चलचित्र सजावट कामी अमृत आरेकर कौस्तुभ आरेकर तरंग गोंजी अभिषेक आरेकर प्रसाद आरेकर विराज आरेकर बाल कलाकार उर्वी आरेकर अनुज्ञा बळी आदित्य गोंजी समर्थ बळी र्यांनी सहकार्य केले असून गोरक्षनाथ प्रकटीकरण चलचित्र गणेशभक्तांचे आकर्षण ठरले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg