loader
Breaking News
Breaking News
Foto

बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे घमासान आंदोलन, बॅरिकेटस् तोडले, पोलिसांनी केला पाण्याचा मारा

पटणा - बिहारमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. निगेटिव्ह मार्किंग आणि परिक्षा पॅटर्न मंजूर नसल्याने हजारो विद्यार्थ्यांनी आज पटणामध्ये आंदोलन केले. बिहारमधील सरकारी नोकर्‍या आणि स्पर्धा परिक्षांमध्ये तरुणांना संधी मिळत नसल्याने आज मंगळवारी शेकडो विद्यार्थ्यांनी पटणाच्या गांधी मैदानात आंदोलन केले. जेव्हा आपला आवाज ऐकला जात नाही, हे लक्षात आले तेव्हा मोठ्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने विद्यार्थ्यांनी मार्च काढला. आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी लावलेले बॅरिकेटस् तोडले आणि घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखले पण विद्यार्थी ऐकण्याच्या तयारीत नव्हते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डाक बंगला नाक्यावर विद्यार्थी आणि सुरक्षारक्षक यांच्यात धक्काबुक्की झाली त्यानंतर पोलिसांनी पाण्याचा मारा सुरु केला. अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. यामध्ये विद्यार्थीही जखमी झाले आहेत. तसेच पोलिसही जखमी झाले आहेत. यावेळी एक विद्यार्थी बेहोश झाल्याचे वृत्त आहे.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांनी १८ ऑगस्टपासून पटणाच्या गर्दनी बाग येथे आपल्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी बिहार लोकसेवा आयोगाकडे टीआरई-४ साठी घोषित परिक्षा पॅटर्न रद्द करण्याची मागणी केली. तसेच बीपीएससी परिक्षा दोन भागात घेण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांनी आपल्या अनेक प्रश्नांवर आंदोलन केले असून हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये सरकारी नोकर्‍या आणि शिक्षक नियुक्त्या १०० टक्के स्थानिक ठेवण्याची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg