loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल पोलीसांनी ४८ तासाच्या आत अपहार झालेले ६६ तोळे सोने व आरोपीस सोलापुरमधुन घेतले ताब्यात

पनवेल :- पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्स शॉप मधील कामगार शुभम मनाजी खिलारे याने दिनांक २०/०८/२०२५ रोजी त्यास फिर्यादीनी सोन्याची शुध्दता तपासण्याकरीता दिलेले एकुण ६६ लाख ६२ हजार ३०० रूपये किमतीची ६६६.२३ ग्रॅम वजनाची ०६ सोन्याची लगड आरोपी याने अप्रामाणिकपणे अपहार केल्याने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे दिनांक २१/०८/२०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी पोलीस पथके तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन आरोपीत याचा शोध घेण्याकरीता रवाना केले. पोलीस पथकाने पनवेल शहर व रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून तसेच तांत्रिक तपास करून आरोपीचा माग काढला असता आरोपीत हा कुरुडवाडी, सोलापुर येथे ट्रेन मधुन उतरल्याचे दिसुन आले. पोलीस पथकाने आरोपीत याचा माग काढत त्याचे मुळ गाव खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर येथे जावुन आरोपीत याचा शोध घेवून आरोपीत शुभम मनाजी खिलारे यास ताब्यात घेवुन त्याने अपहार केलेला गुन्हयातील माल ६६६.२३ ग्रॅम वजनाची ०६ सोन्याची लगड हस्तगत करण्यात केला आहे.

टाईम्स स्पेशल

सदरची कार्यवाही पोलीस उप आयुक्त रश्मी नांदेडकर, परिमंडळ ०३, पनवेल, सहा. पोलीस आयुक्त मधुर भुजबल, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाला कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकिर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग, पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि अभिजीत पाटील, पोउपनि हजरत पठाण, पोउपनि किरण राऊत, पोहवा अविनाश गंथडे, योगेश दिवेकर, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, पोना मिथुन भोसले, पोशि किरण कराड, सोमनाथ म्हात्रे, शशिकांत काकड यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg