loader
Breaking News
Breaking News
Foto

ॲड. ज्योत्स्ना काताळकर यांची कुटगिरी-पाती तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

आबलोली (संदेश कदम) - स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या सल्लागार ॲड. ज्योत्स्ना विनय काताळकर यांची मौजे कुटगिरी-पाती महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी तसेच विविध तंटे सामंजस्याने सोडविण्यासाठी त्यांनी यापूर्वीही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ऍड. ज्योत्स्ना विनय काताळकर यांच्या निवडीबद्दल स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप तुकाराम खेतले यांचेसह कुटगिरी - पाती ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करुन ऍड.ज्योत्स्ना विनय काताळकर यांना पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg