loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली येथील श्री हसलाई देवी मंदिरात जागरी पौर्णिमेनिमित्त देवीला रूपे लावणे कार्यक्रम संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी मंदिरात जागरी पौर्णिमेनिमित्त देवीला रूपे लावणे हा धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला. देव देवतांचे रूपे ही देवीची सहान येथून देवीचे गावकर व ग्रामस्थ मंडळी यांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मंदिरामध्ये आणले. त्यानंतर मंदिरातील देव देवतांचे पूजन केल्यानंतर देव देवतांना पारंपरिक पद्धतीने रूपे लावण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवीच्या रूपे यांना वस्त्रे व अलंकारानी सजविण्यात आले. ग्रामस्थांनी पोवते विणण्याचे काम केले. मंदिर परिसरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी देवदेवतांचे रूपे उतरविण्यात आली. त्यांनंतर ग्रामदेवतेला पोवते अर्पण करण्याचा कार्यक्रम मंदिरात भक्तिभावाने पार पडला.या धार्मिक सोहळ्यासाठी ग्रामस्थ होते. या कार्यक्रमासाठी श्री हसलाईदेवी देवस्थान समिती व चतुर सीमेतील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg