loader
Breaking News
Breaking News
Foto

CJI सूर्यकांत यांची 'झुरळ' टिप्पणी CJP च्या सौरव दास यांच्यावर होती? अभिजीत दिपके यांचा स्फोटक खुलासा

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक अभिजीत दिपके यांनी असा दावा केला आहे की, भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी 'कॉकरोच' (झुरळ) हा शब्द वापरून 'जेन-झेड' (Gen-Z) चळवळीला जन्म दिला; हा शब्दप्रयोग त्यांनी पक्षाचे सह-संयोजक सौरव दास यांना उद्देशून केला होता, ज्यांचे वर्णन दिपके यांनी 'ओजी कॉकरोच' (OG Cockroach) असे केले आहे.विशेष म्हणजे, न्यायपालिका आणि कायदेशीर व्यवस्थेवर होणाऱ्या वाढत्या व अनावश्यक टीकेवर भाष्य करताना, सरन्यायाधीश कांत यांनी या वर्षी मे महिन्यात एका सुनावणीदरम्यान 'कॉकरोचेस' (झुरळे) हा शब्द वापरला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रसार माध्यम कडे दिलेल्या मुलाखतीत अभिजित दिपके यांनी दावा केला की, सरन्यायाधीश कांत यांनी पत्रकार असताना न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वार्तांकनावरून दास यांच्यासाठी 'झुरळ' (cockroach) हा शब्द वापरला होता."सौरवसाठी 'झुरळ' हा शब्द वापरला गेला. तो (दास) एक 'अस्सल झुरळ' (OG cockroach) आहे," असे दिपके म्हणाले.मुलाखतीदरम्यान उपस्थित असलेल्या दास यांनी सांगितले की, अनेक लोकांनी त्यांना असे सांगितले होते की रन्यायाधीशांची ती टिप्पणी त्यांच्यावरच उद्देशून केलेली असावी; कारण एका वृत्तसंस्थेसाठी काम करत असताना ते सरन्यायाधीशांवरील एका विशेष लेखावर (प्रोफाईलवर) काम करत होते. ( आम्ही या वृत्तास दुजोरा देत नाही किव्वा आमचे समर्थन व पाठबळ नाही .)

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg