loader
Breaking News
Breaking News
Foto

पूर्णगड ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी वासुदेव वाघे तर उपाध्यक्षपदी आशीष भाटकर यांची एकमताने निवड

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - पूर्णगड ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी वासुदेव वाघे तर उपाध्यक्षपदी आशिष भाटकर यांची नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात खेळीमेळीच्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात निवड करण्यात आली. गावातील सामाजिक सलोखा, शांतता आणि एकोपा कायम राखण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची भूमिका महत्वाची मानली जाते गावातील छोटे मोठे वाद गैरसमज तसेच सामाजिक प्रश्न स्थानिक पातळीवर सामजस्याने सोडवण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी झालेली निवड सर्वानुमते झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अध्यक्षपदी निवड झालेल्या वासुदेव वाघे यांचा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यात सक्रिय सहभाग असून ते विविध संस्थामध्ये सक्रिय पदाधिकारीही आहेत व गावातील उपक्रमात ही ते सहभागी असतात तसेच उपाध्यक्षपदी निवड झालेले आशिष भाटकर हे युवा कार्यकर्ते असून युवकांना सामाजिक व विविध उपक्रमात सहभाग करून घेण्याबरोबरच गावातील विविध प्रश्नासाठी पुढाकार घेण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. या दोन्ही पदाधिकार्याच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा समितीच्या कामकाजाला निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

निवड प्रक्रियेवेळी पूर्णगड ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आणि शेकडो ग्रामस्थांच्या सहमतीने ही अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली या निवडीनंतर मान्यवर ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. गावातील विविध प्रश्नावर ग्रामस्थामध्ये संवाद वाढविणे, परस्परातील गैरसमज दूर करणे, आणि कोणताही वाद निर्माण झाल्यास तो सामोपचाराने सोडविण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. गावातील शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg