loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये वैद्यकीय तपासणी संपन्न

खेड - शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस मधील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींकरिता वैद्यकीय तपासणीचे आयोजन मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यासाठी पर्शुराम हाॅस्पिटल एण्ड रिसर्च सेंटर येथील डॉ.मुग्धा बेलवलकर, डाॅ.सायली सकपाळ, डाॅ.मयुरी उंडे यांच्यासह सुष्मिता पाटील, कोमल आंब्रे, अर्पिता शिरकर व भक्ती आंब्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेतर्फे पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

आपल्या अध्यक्षीय भाषणात कडवईकर यांनी उत्तम नियोजनासाठी सर्व संबंधितांचे कौतुक करताना मुलींनी न घाबरता आपल्या समस्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात, असे आवाहन केले. वैद्यकीय तपासणी उपक्रमासाठी प्रशालेतील शिक्षिका स्नेहल खेडेकर व निलोफर काझी यांनी विशेष मेहनत घेतली होती. त्यांना सर्व कर्मचारी व विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg