रत्नागिरी, : रत्नागिरी जिल्ह्यात रेटिनासंबंधित आजारांसाठी विशेष उपचार सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी शाखेत दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेटिना तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष ओपीडी व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. याच उपक्रमांतर्गत २३, २४ आणि २५ ऑगस्ट रोजी रेटिना तज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत यांनी इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या रत्नागिरी शाखेत रुग्णांची तपासणी केली. या तीन दिवसांत सुमारे २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच रेटिनाशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवरील सुमारे १५ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.तसेच संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण 500 हुन अधिक गुंतागुंतीच्या रेटीना शस्त्रक्रिया केल्या आहेत.
रेटिनाचे आजार, डायबेटिक रेटिनोपॅथी, रेटिनल डिटॅचमेंट यांसारख्या गंभीर समस्यांवर वेळेवर निदान व उपचार न झाल्यास दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात रेटिना तज्ज्ञांची नियमित उपलब्धता रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जण आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट हॉस्पिटल असून, पात्र रुग्णांना या योजनांमधून रेटिनाशी संबंधित विविध आजारांवर उपचाराचा मोफत लाभ मिळू शकतो. या सुविधेमुळे आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना मोठी मदत होत असून, अनेक रुग्णांनी शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेत उपचार करून घेतले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात रेटिना उपचारांसाठी विशेष सुविधा मर्यादित असताना, इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये रेटिना तज्ज्ञांची नियमित भेट आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होण्यास मदत होत आहे. “रेटिनाच्या आजारांचे लवकर निदान आणि योग्य वेळी उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रत्नागिरी व परिसरातील रुग्णांना तज्ज्ञ रेटिना सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,”आणि या शासकीय योजनेअंतर्गत डोळ्यांच्या अनेक मोफत शस्त्रक्रिया होत असून रत्नागिरीमधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेटिना तज्ज्ञांची सेवा उपलब्ध राहणार असल्याने रत्नागिरी व आसपासच्या भागातील रुग्णांनी वेळेत तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.