loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर वरचापाट येथे संरक्षण भिंत बांधणे कामाचे नगराध्यक्ष नीता मालप यांच्या हस्ते भूमिपूजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील गुहागर वरचापाट येथील करण मोरे घर ते सुहास कचरेकर घरापर्यंत संरक्षण भिंत बांधणे तसेच तोडणकर घर ते सचिन साखरकर घरापर्यंत संरक्षण भिंत बांधणे या कामाचे भूमिपूजन गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष नीता मालप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडळ, बांधकाम सभापती उमेश भोसले, स्वच्छता व आरोग्य सभापती सुजित साटले, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगरसेवक संतोष सांगळे, नगरसेविका मीरा घाडे, सुष्मा रहाटे, विशाखा सोमण, कोमल जांभळी, स्मिता जांगळी, अभियंता आशिष खांबे, नगर अभियंता विजय भूतल, भाजप तालुका महिला अध्यक्ष प्रांजल कचरेकर, श्री नर नारायण मंडळ अध्यक्ष मयुरेश साखरकर, निलेश मोरे, मोरेश्वर भोसले, पद्माकर भोसले, मनीष मोरे, संगम मोरे, मंदार मोरे, संजय भोसले, शैलेश भोसले, प्रशांत कचरेकर, मंदार कचरेकर, मैथली भोसले, अनघा कचरेकर, ठेकेदार ओम वेल्हाळ, सायली तोडणकर, शिवानी तोडणकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी गुहागर वरचा पाट येथील श्री नर नारायण मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण व सर्व नगरसेवक तसेच अभियंता आशिष खांबे, नगर अभियंता विजय भूतल यांचा सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार बांधकाम समिती सभापती उमेश भोसले यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg