loader
Breaking News
Breaking News
Foto

यंदा लांजा तालुक्यात सार्वजनिक आणि घरगुती अशा तब्बल १६ हजार १४७ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

केळंबे-लांजा दी.13स.(सिराज नेवरेकर): गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर आज संपणार असून गणपती बाप्पा मोरया..चा जयघोष करीत.. ढोल-ताशांचा गजर करत लांजा शहरासह तालुक्यात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडपांमध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले . यंदा लांजा तालुक्यात सार्वजनिक आणि घरगुती अशा तब्बल १६ हजार १४७ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये ८ सार्वजनिक गणपती तर तब्बल १६ हजार १३९ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे.आज सकाळ पासून गणरायाचे आगमनाच्या मिरवणूका निघाल्या गावागवात बालगोपाळसह आबाळ वृध्दानी आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घरी आणले .यंदा गणेशोत्सवात पारंपारिक वाद्य लेझीम ढोल तासे यावरच गणेश भक्तानी भर दिलेला दीसून आला.सर्वत्र. सौहार्दाचे आनंदाचे प्रेमाचे एकतेचे दर्शन झाले.गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर तयारी करण्यात आली आहे. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी लांजा पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.

टाइम्स स्पेशल

गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी तालुक्यात पाच नदीपात्रे आणि एका कृत्रिम तलावासह एकूण सहा प्रमुख विसर्जनस्थळे आहेत. विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.दरम्यान, गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी सजलेली आरास, सार्वजनिक मंडपांमधील आकर्षक सजावट आणि बाप्पाच्या आगमनाची लगबग यामुळे लांजा तालुक्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी लांजावासीय सज्ज झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg