loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत दीड दिवसाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप; ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात विसर्जन

सावंतवाडी (प्रतिनिधी): ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात आणि मांगल्यमय वातावरणात सावंतवाडी तालुक्यात दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महागाईची झळ आणि पावसाच्या अभावामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे सावट असले, तरी बाप्पाच्या आगमनाचा आणि विसर्जनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. ​सावंतवाडी तालुक्यातील गावागावांत दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांच्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दीड दिवसांच्या गणपतींना मंगळवारी यथोचित पूजा, आरती आणि भजनाच्या सुरेल तालावर भाविकांनी निरोप दिला. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून सुरू झालेले विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानावरील दीड दिवसाच्या गणपतीचे घरच्या घरी कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या तळीत विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी पल्लवी केसरकर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. सावंतवाडी संस्थानाच्या राजघराण्याच्या ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा 'लाल रंगाच्या' गणपती बाप्पालाही दीड दिवसांनंतर मोती तलावात भावपूर्ण निरोप देण्यात आला. या विसर्जन मिरवणुकीला श्रीमंत खेम सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व भाविक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg