loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास; उमराट डागवाडीतील उबाठा गटाचा शिवसेनेत प्रवेश

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत उमराट डागवाडी येथील उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे परिसरातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळाले आहे. नेत्राताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्राताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या विचारांना साथ देत शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुक्याचे सभापती प्रणव पोळेकर, माजी सभापती राजेश दादा बेडंल, तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, नगरसेवक अमरदीप परचुरे, महादेव वणे, मारुती होडेकर, सुप्रिया पवार, श्याम आठवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

नव्याने शिवसेनेत प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचे नेत्राताई ठाकूर यांनी स्वागत केले. गावागावांत विकासाची कामे पोहोचवणे, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि संघटना अधिक मजबूत करणे यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळाले असून, आगामी काळात पक्षसंघटना अधिक सक्रिय करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg