नवी दिल्ली: संतोष डावखर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) शुक्रवारी, 18 सप्टेंबर रोजी याबाबत घोषणा केली. ९९व्या अकादमी पुरस्कारांच्या ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ श्रेणीसाठी भारताकडून हा चित्रपट पाठवण्यात येणार आहे.
ऑस्करच्या भारताच्या अधिकृत प्रवेशिकेसाठी यंदा एकूण ३३ चित्रपट विचारात घेण्यात आले होते. यामध्ये हिंदीसह मराठी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम आणि इतर भाषांतील चित्रपटांचा समावेश होता. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष दिग्दर्शक पी. शेषाद्री होते. समितीने या सर्व चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली. ‘गोंधळ’ची कथा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटाची कथा एका नवविवाहित जोडप्याशी संबंधित पारंपरिक गोंधळ विधीच्या एका रात्रीभोवती फिरते. पारंपरिक लोककला, संगीत, नृत्य आणि पौराणिक संदर्भांच्या पार्श्वभूमीवर मानवी नातेसंबंध, इच्छा, फसवणूक आणि संघर्ष यांचा वेध चित्रपटात घेण्यात आला आहे. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.
‘गोंधळ’चा जागतिक प्रीमियर २०२५मध्ये गोव्यात झालेल्या ५६व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात झाला होता. या महोत्सवात संतोष डावखर यांना दिग्दर्शनासाठी सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर चित्रपटाला इतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही गौरव मिळाला.चौथा मराठी चित्रपट ‘गोंधळ’ हा भारताची ऑस्कर प्रवेशिका ठरलेला चौथा मराठी चित्रपट आहे. यापूर्वी ‘श्वास’ (२००५), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) आणि ‘कोर्ट’ (२०१५) या मराठी चित्रपटांची भारताकडून ऑस्करसाठी निवड झाली होती. ९९वा अकादमी पुरस्कार सोहळा १४ मार्च २०२७ रोजी होणार आहे. त्यामुळे आता ‘गोंधळ’ अंतिम शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवतो का आणि पुढे ऑस्करच्या अंतिम नामांकनापर्यंत पोहोचतो का, याकडे मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.