loader
Breaking News
Breaking News
Foto

हातात चाकू घेऊन गावात दहशत; मंडणगडमध्ये तरुणावर गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) : तिडे-निमदेवाडी गावात हातात चाकू घेऊन फिरत नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या तरुणाविरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1.50 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीस हवालदार विशाल विठ्ठोबा कोळथरकर यांनी फिर्याद दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संशयित आरोपी नितीन नरेश मोहिते (वय 29, रा. तिडे निमदेवाडी) हा गावात हातात चाकू घेऊन फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या या कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपीकडून 20 रुपये किमतीचा एक लोखंडी पात्याचा चाकू जप्त केला असून मंडणगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 117/2026 नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg