loader
Breaking News
Breaking News
Foto

चाकाळे हनुमान नगर येथे मागील वादाचा राग मनात धरुन काठीने मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील चाकाळे हनुमान नगर येथे किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश सखाराम कदम (४५, रा. चाकाळे हनुमाननगर) हे दि. १८ रोजी दुपारी १ वाजता ललिता घाणेकर यांच्या भाड्याच्या घरासमोर बसले असताना मागील वादाचा राग मनात धरून संशयित आरोपी दिपक पांडुरंग भिलारे, पुष्पा पांडुरंग भिलारे आणि दिपक भिलारे यांच्या मुलाने (सर्व रा. जगदिशनगर, चाकाळे) शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दिपक भिलारे याने सोबत आणलेल्या काठीने कदम यांच्या डोक्यात, दोन्ही हातांवर, पाठीवर व छातीवर मारून दुखापत केली.

टाईम्स स्पेशल

याबाबतची फिर्याद दि. १८ सप्टेंबर रोजी दाखल झाली असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गु.र.नं. ३४९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg