loader
Breaking News
Breaking News
Foto

वडाळे तलाव परिसरात मोटरसायकलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांवर कारवाई

पनवेल :- पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पनवेल शहर वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळे तलाव परिसरात मोटरसायकलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांविरोधात विशेष कारवाई करण्यात आली. वडाळे तलाव परिसरात विनाहेल्मेट मोटरसायकल चालविणे, मोटरसायकलवर ट्रिपल सीट प्रवास करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मोटरसायकलवरून फिरणाऱ्या तरुणांवर वाहतूक शाखेच्या पथकाने नियमानुसार कारवाई केली. कारवाईदरम्यान संबंधित मोटरसायकल चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मोटरसायकल चालविताना हेल्मेटचा वापर करणे व ट्रिपल सीट प्रवास टाळणे तसेच स्वतःच्या व इतर नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कारवाईदरम्यान पोलीस हवालदार सागर ढेंबरे, पोलीस नाईक केशव निकम पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पवार यांनी सक्रिय सहभाग घेत मोटरसायकलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. मोटरसायकलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारची विशेष मोहीम सुरू ठेवण्यात येणार असून, सर्व मोटरसायकल चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg