loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आमदार बाळ माने यांनी घेतली पिलणकर कुटुंबाकडील बाप्पाची सदिच्छा भेट!

रत्नागिरी (जमीर खलफे) : गणेशोत्सवाच्या या पवित्र आणि मांगल्याच्या वातावरणात कोकणात ठिकठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर, माजी आमदार बाळ माने यांनी कोमल पिलणकर आणि दुर्गेश पिलणकर यांच्या निवासस्थानी जाऊन लाडक्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सदिच्छा भेटीदरम्यान पिलणकर कुटुंबात अत्यंत आनंदाचे व आल्हाददायक वातावरण पाहायला मिळाले. बाप्पाच्या दर्शनावेळी राजेश पिलणकर, एकनाथ पिलणकर, हर्षदा पिलणकर, रिया पिलणकर, स्वाती पिलणकर, चंदना पिलणकर यांच्यासह संपूर्ण पिलणकर परिवार उपस्थित होता.

टाईम्स स्पेशल

या मंगल प्रसंगी बाप्पाच्या सानिध्यात सर्वांनी परस्परांसोबत आपुलकीने संवाद साधला. बाप्पाच्या कृपेने सर्वांच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदावे, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. गणरायाच्या भक्तीत आणि आप्तांच्या सहवासात रंगलेला हा आनंदाचा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत स्मरणीय ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg