loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड बोरज येथे सनगरे परिवाराने साकारला पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा देखावा

खेड - कोकणामध्ये सध्या गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून, सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच घरगुती गणेशोत्सवातही विविध आकर्षक देखावे साकारले जात आहेत. खेड तालुक्यातील बोरज येथे सनगरे परिवाराने यंदा पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा देखावा साकारला आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि पवित्र वटवृक्षाची प्रतिकृती या देखाव्यातून साकारण्यात आली असून, हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड तालुक्यातील बोरज गावात सनगरे परिवाराच्या घरगुती गणेशोत्सवात यंदा भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि वटवृक्षाचा देखावा साकारण्यात आला असून, हा देखावा गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे. वाढत्या पर्यावरणाच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. वटवृक्षाचे धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणातील त्याचे योगदान याची सांगड घालत हा देखावा तयार करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, देखाव्याच्या माध्यमातून केवळ धार्मिक भावना जपण्याचा प्रयत्न न करता निसर्ग संवर्धनाचा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थांच्या मंदिराची प्रतिकृती आणि वटवृक्ष पाहण्यासाठी परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने बोरज येथे भेट देत आहेत. घरगुती गणेशोत्सवातून सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देण्याचा सनगरे परिवाराचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम घडवणारा हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg